तीन लांडग्यांचा कळप शेळ्यांवर तुटून पडला; सहा शेळ्या ठार, दोन गंभीर जखमी
शहापूर शिवारातील घटना; पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण, नुकसानभरपाईची मागणी
नळदुर्ग, दि. ६ ऑगस्ट :
तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावच्या शिवारात गुरुवारी (दि. ६) दुपारी तीनच्या सुमारास तीन लांडग्यांनी शेळ्यांच्या कळपावर अचानक हल्ला चढविल्याने सहा शेळ्या जागीच ठार झाल्या, तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरातील पशुपालक, शेळीपालक व मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर येथील रेवन आप्पाराव गोरे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी शहापूर-सराटी मार्गावरील बळी जाधव यांच्या शेतात गेले होते. गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दुपारी अचानक तीन लांडग्यांनी शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात सहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच शेतकरी संघर्ष समितीचे नेते दिलीप जोशी यांनी तातडीने दूरध्वनीद्वारे तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांना माहिती देत पंचनामा करून बाधित पशुपालकास त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
दरम्यान, शहापूर परिसरात वन्य प्राण्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय ठरत असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना करून लांडग्यांचा बंदोबस्त करावा, तसेच पशुपालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावच्या शिवारात गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक शेळ्यावर तीन लांडग्यांनी हल्ला करून सहा शेळ्या ठार केल्या तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेळी व मेंढपाळामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तुळजापूर तालुक्यातील शहापूर शिवारातील सराटी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बळी जाधव यांच्या शेतात गुरुवारी रेवन आप्पाराव गोरे रा.शहापूर हे नेहमीप्रमाणे आज आपल्या शेळ्या घेऊन शेतात चारण्यासाठी गेले होते .गावापासून एक किलोमीटर अंतरावर दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावर अचानक तीन लांडग्यांनी बेसावध शेळ्यावर हल्ला चढविला.या हाल्लयात सहा शेळ्या जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच शेतकरी संघर्ष समितीचे नेते दिलीप जोशी यांनी दूरध्वनी वरून तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे यांना कळविली.