गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना यशाची नवी प्रेरणा;  महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा स्तुत्य उपक्रम 

नळदुर्ग, दि. १८ ऑगस्ट : 


गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना यशाची नवी प्रेरणा;  महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा स्तुत्य उपक्रम 

नळदुर्ग, दि. १८ ऑगस्ट : 

शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असून, विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, ध्येय आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर यशाचे शिखर गाठावे, असे प्रतिपादन अचलेर हिरेमठ संस्थानचे गुरुवर्य श्री. सुत्रेश्वर महास्वामी यांनी केले.

नळदुर्ग शहरातील श्री मल्लिकार्जुन मंदिर सभागृहात रविवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर विभुते यांच्या पुढाकारातून कै. सुभाष काशिनाथ विभुते यांच्या स्मरणार्थ ‘गौरव गुणवंतांचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तुळजापूर तालुकाध्यक्ष ॲड. अरविंद बेडगे होते. उद्घाटक म्हणून गुरुवर्य श्री. सुत्रेश्वर महास्वामी , पोलीस उपनिरीक्षक श्री आनंद कांगुणे, विद्या विकास मंडळाचे सचिव  पृथ्वीराज पाटील, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे अधिष्ठाता  राजशेखर हिरेमठ, विद्या विकास मंडळाचे संचालक  संतोष सोलंकर , राजकुमार पाटील, माजी सैनिक गुंडया स्वामी, शिवय्या स्वामी, सहसचिव डॉ श्री डी एम पाटील उपस्थित होते. 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, युवा सेना राज्य सहसचिव सौ. उषा घोलप, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ. मंगल पाटील, बार्शी तालुका शिवसेनाप्रमुख पांडुरंग गपाट, युवा सेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख पांडुरंग घोलप , हॅलो फाऊंडेशनच्या सौ.प्रणिता भोसले,  विकास भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व कै. सुभाष काशिनाथ विभुते यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना सुत्रेश्वर महास्वामी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आयोजक सिद्धेश्वर विभुते यांच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. शासन व शिक्षण व्यवस्थेबाबत उपस्थित अनेक मान्यवरांनी परखड मते व्यक्त केली. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या अशा उपक्रमांची समाजाला गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

अध्यक्षीय समारोपात ॲड. अरविंद बेडगे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती भूमिका बजावावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश्वर विभुते यांनी केले. सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी, तर आभार तनुजा दुलंगे यांनी मानले.
कार्यक्रमास  जिल्हा उपाध्यक्ष सौ दीपिका स्वामी,
वैजीनाथ पटणे, डॉ. डी. एम. पाटील,   पं. स. माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे, माजी सैनिक शरणय्या स्वामी, लेफ्टनंट डॉ. अतिश तिडके, सरदारसिंग ठाकूर, संतोष पुदाले, शहर उपप्रमुख नेताजी महाबोले, सोमनाथ म्हेत्रे, श्याम कनकधर,  निलय्या स्वामी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी कलशेट्टी, पाटील, स्वप्नजीत गायकवाड, अतिश जाधव, गणेश पवार, गणेश पोतदार, विवेक पोतदार, विघ्नेश पोतदार, समर्थ बेडगे, गणेश विभुते, शितल सिंग बायस, सोहम कलशेट्टी, नागेश कुंभार, मल्लिनाथ शिवमुर्ती आदींनी परिश्रम घेतले.

 
Top