क्रांती तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अतुल पाटील तर सचिवपदी अप्पाराव  होळे यांची निवड 

नळदुर्ग,दि.१७ ऑगस्ट : 

गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर लोहगाव  ता.तुळजापूर  येथील क्रांती तरुण गणेश मंडळाच्या नियोजनाची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी गणेशोत्सवाचे नियोजन, विविध उपक्रम तसेच मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

बैठकीत अध्यक्षपदी अतुल सुनील पाटील, तर उपाध्यक्षपदी अशोक बसवराज बिराजदार आणि सचिवपदी अप्पाराव बाबुराव होळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तसेच गणेशोत्सवातील मिरवणुकीची जबाबदारी सचिन शिंगाडे, दत्ता कदम, दादा काटकर, स्वामीनाथ पांचाळ, अक्षय सज्जन पाटील, म्हाळाप्पा बनसोडे, म्हांतेश्वर शिंगाडे, समर्थ पाटील व वैभव पाटील यांच्यावर सोपविण्यात आली.

गणेशोत्सव उत्साहात, शिस्तबद्ध आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी क्रांती तरुण गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मंडळाच्या सदस्यांसह नागरिकांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top