न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अभिषेक हुलगे तर उपाध्यक्षपदी अविश चव्हाण,सुमित नितळे यांची निवड
नळदुर्ग,दि.१७ ऑगस्ट :
ब्राह्मण गल्ली येथील न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळ,व सुंदरदेवी नवरात्र महोत्सव 2026 गणेशोत्सव व नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्याच्या नियोजना संदर्भात बैठक पार पडली.
मंडळाची नुतन कार्यकारणी सर्वानुमते पुढीलप्रमाणे निवडण्यात आली आहे.
अध्यक्षपदी अभिषेक हुलगे,उपाध्यक्ष अविश चव्हाण,सुमित नितळे,कोषाध्यक्ष आत्माराम रामदासी,सचिव उमेश अवचार, सह.सचिव केशव घाटे यांची निवड करण्यात आली आहे,यंदाही मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून अनंत चतुर्दशी दिवशी श्रीची भव्य मिरवणूक करण्यासाठी तयारी केली जाणार आहे.