शिवनेरी तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सुनील चौधरी, तर कोषाध्यक्षपदी प्रशांत मारेकर

नळदुर्ग, दि. १८ ऑगस्ट :

नळदुर्ग शहरातील शिवनेरी तरुण गणेश मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी सुनील (बबन) चौधरी, तर कोषाध्यक्षपदी प्रशांत मारेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी बाळू शिंदे व तुकाराम घोडके, सचिवपदी नितीन पाटील व स्वप्नील जाधव यांची निवड झाली. तसेच मिरवणूक प्रमुखपदी शरद बागल, शिवाजी धुमाळ व प्रशांत मिटकर यांची जबाबदारी सोपविण्यात आली.

कार्यकारिणीमध्ये बाळू पाटील, धिमाजी घुगे, महादू सुरवसे, गिरीश कुलकर्णी, राजू नाईक, प्रसन्न कदम, सुशील चौधरी, विनय राठोड, पिंटू गव्हाने, मल्हारी कोकरे, रोहित शंकर शेट्टी, श्रीपती आवताडे, कपिल अंगुले, वैभव पाटील, संदीप शहाणे, अभय जाधव, गणेश शिंदे, विवेक माने, दौलतराव खाटमोडे, विनोद जाधव, विनय सातपुते, विक्रम जाधव, आशिष जगदाळे, विशाल मोटे, स्वप्निल मोटे व अमित शिंदे यांचा समावेश आहे.

दरम्यान, महावितरणचे कर्मचारी सचिन काळे यांनी गणेशोत्सवासाठी श्रींची मूर्ती दिली आहे. नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला.
 
Top