आलियाबादमध्ये मोफत आरोग्य शिबिर; ४१७ रुग्णांची तपासणी
नळदुर्ग, दि. २० ऑगस्ट :
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ४१७ रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अशोक पाटील, पंचायत समितीचे सदस्य आशिष सोनटक्के व भिवा इंगोले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. सरपंच सूर्यकांत चव्हाण यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
शिबिरात हृदयरोग, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा तसेच पोटाचे विकार आदी विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपसरपंच अमृता चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, लक्ष्मण राठोड, दामाजी राठोड, नेमिनाथ चव्हाण, सुभाष नाईक, विनायक चव्हाण, माणिक राठोड, सिद्राम पवार, यशवंत राठोड, पांडुरंग चव्हाण, महादेव राठोड, सुभाष चव्हाण, मोतीराम राठोड, बाबुराव चव्हाण, तानाजी राठोड, संदीप राठोड, सिताराम राठोड, वसंत चव्हाण, बाबू जाधव, विश्वनाथ चव्हाण, वाय. आर. राठोड आदींसह माजी सरपंच ज्योतिका चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या शांताबाई राठोड, रेखा चव्हाण, राजश्री चव्हाण, निर्मला राठोड व वंदना चव्हाण उपस्थित होत्या.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. सानिका साखरे, डॉ. रोहिणी दत्ता, डॉ. आकाश मकदूम, डॉ. मिताली ढोबळे, डॉ. अकांशा धडाम, आमिन सय्यद, आशा कार्यकर्त्या रेश्मा चव्हाण व सिताबाई चव्हाण यांनी परिश्रम घेतले. शिबिराचा गावातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.