कॅमेऱ्यात टिपणाऱ्या क्षणांचे शिल्पकार सन्मानित! जागतिक छायाचित्र दिनानिमित्त नळदुर्ग शहरात छायाचित्रकारांचा गौरव

नळदुर्ग, दि. २० ऑगस्ट :

क्षण निघून जातो; मात्र छायाचित्र त्या क्षणाला कायमचे जिवंत ठेवते. समाजजीवनातील घटना, संस्कृती, परंपरा आणि मानवी भावविश्व आपल्या कॅमेऱ्यात अचूकपणे टिपणाऱ्या छायाचित्रकारांचा जागतिक छायाचित्र दिनानिमित्त नळदुर्ग येथे उत्साहपूर्ण वातावरणात सन्मान करण्यात आला.

बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने छायाचित्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेश पूजन तसेच कॅमेरा पूजन करण्यात आले. त्यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते उपस्थित छायाचित्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सिद्धाराम खजुरे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन राठोड, फोटोग्राफर असोसिएशनचे कोअर कमिटी सदस्य धनराज साखरे, महेबुब शेख, संजय कुंभार, अनिल जाधव व रियासत शेख उपस्थित होते.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निजाम शेख, सचिव गणेश जवळगे यांच्यासह नितीन गायकवाड, संतोष व्हटकर, अलीम शेख, शुभंक मायाचारी, शिवानंद नाटेकरी, किरण कांबळे, किरण कानडे, सुनील दीक्षित, श्रीकांत लोहार, विकी धुते, श्रीनाथ आंगुले, प्रणव खुने, गुरुनाथ कोळी, रोहित राठोड, बबलू बिराजदार, भैय्या मोरे, मारुती कोळी, अक्षय पाटील, विशू बोंगरगे, महादेव सुरवसे, रमेश दबडे, लखन वाघमारे, किशोर दबडे, प्रतीक खुने यांच्यासह तालुक्यातील अनेक फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र म्हणजे आठवणींचा ठेवा’
छायाचित्र हे केवळ एक चित्र नसून, एखाद्या अविस्मरणीय क्षणाची कायमस्वरूपी आठवण असते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वपूर्ण घटना, संस्कृती, परंपरा आणि भावभावना पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार निजाम शेख यांनी मानले.
 
Top