तुळजापूर दयावान युवा मंचाच्या अध्यक्षपदी सुरज गायकवाड; यंदा राजहंसावर विराजमान विघ्नहर्त्याचे आकर्षण

तुळजापूर, दि. १९ ऑगस्ट :

मराठवाड्यातील उंच व आकर्षक गणेशमूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी लौकिक मिळविलेल्या दयावान युवा मंच गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सुरज गायकवाड यांची निवड करण्यात आली.

 संस्थापक अध्यक्ष मिथुन पोफळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्षपदी कुलदीप गरड, सचिवपदी दीदार सय्यद, कोषाध्यक्षपदी बाजीराव शिंदे, तर कार्याध्यक्षपदी कुणाल रोंगे व दादाराव गोरे यांची निवड करण्यात आली. मंडळाचे मार्गदर्शक विजय कंदले, आनंद कंदले, जगदीश पाटील, पंकज पाटील आदी उपस्थित होते.

राजहंसावर विराजमान विघ्नहर्त्याची उत्सुकता
यंदाच्या गणेशोत्सवात दयावान युवा मंचाकडून राजहंसावर विराजमान झालेल्या विघ्नहर्त्या गणरायाच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या प्रेक्षणीय मूर्तीचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, गणेशमूर्तीचे रूप पाहण्यासाठी तुळजापूरकरांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

२१ वर्षांपासून वर्गणीमुक्त गणेशोत्सव
दयावान युवा मंच गेल्या २१ वर्षांपासून वर्गणीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा जपत आहे. यंदाही भव्य गणेशमूर्तीसोबत विविध सामाजिक, धार्मिक व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अन्नदानासह महिलांसाठी विशेष ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेनंतर सलग दहा दिवस महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम घेण्यात येणार असून, सहभागी महिला व विद्यार्थ्यांसाठी तब्बल दीड लाख रुपयांच्या संसारोपयोगी वस्तूंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

मंडळाचे जवळपास ४०० सभासद असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याला मंडळाकडून प्राधान्य दिले जाते. त्यामुळे यंदाचा दयावान युवा मंचाचा गणेशोत्सव तुळजापूरकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
 
Top