जय हिंद तरुण गणेश मंडळाची नुतन कार्यकारणी जाहीर,व्यासनगरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी; सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध समित्यांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

नळदुर्ग, दि. २२ ऑगस्ट: 

शहरातील व्यासनगरच्या  जय हिंद तरुण गणेश मंडळाने गणेशोत्सव २०२६ साठी नव्या कार्यकारणीची घोषणा केली असून, यंदाचा गणेशोत्सव  विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन व आयोजनासह भव्य मिरवणूक, आकर्षक सजावट, नृत्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, आरोग्य व स्वच्छता उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

मंडळाच्या अध्यक्षपदी अजय दासकर, उपाध्यक्षपदी अरुण घोडके व नितीन चौधरी, तर खजिनदारपदी नितीन कुलकर्णी व अक्षय दासकर यांची निवड करण्यात आली आहे. श्रींची मूर्ती अरुण घोडके यांच्याकडून, तर श्रींचा पोशाख वैभव पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे.

गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या मिरवणुकीसाठी नवल जाधव, संदीप गायकवाड, शंकर भाळे, प्रवीण चव्हाण, वैभव पाटील, मंगेश घोडके व सुदर्शन सुरवसे यांची मिरवणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सजावट प्रमुखपदी संदीप सातपुते, पंकज राठोड व विश्वजित भुसारे यांची निवड झाली आहे. मंडपाची सजावट व आरती व्यवस्थेची जबाबदारी विनील जांभळे, विशाल कलशेट्टी, संदीप वैद्य व वैभव कलशेट्टी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

सुरक्षा, प्रसिद्धी अन् सांस्कृतिक उपक्रमांवर भर

मंडळाच्या सुरक्षेची जबाबदारी पिंटू जाधव, सोमा बताले, ऋषी भैय्या ढोणे व सोनू पांचाळ यांच्यावर देण्यात आली आहे. प्रसिद्धी प्रमुख म्हणून नितीन गायकवाड, भगवंत जाधव, आनंद  लाटे व अंकित मगतराव काम पाहणार आहेत.
गणेशोत्सवात होणाऱ्या नृत्य स्पर्धेच्या आयोजनाची धुरा सनी  मोटे, स्वप्नील  काळे  यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर स्पोर्ट्स कमिटी प्रमुख म्हणून सचिन गायकवाड, अमोल मेंडके , बंटी बताले यांची निवड करण्यात आली आहे.
आरोग्य, स्वच्छता व विद्युत व्यवस्थेलाही प्राधान्य
आरोग्य व स्वच्छता प्रमुख म्हणून डॉ. स्वामी  डॉ. विवेक मुळे ,यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्युत व्यवस्था प्रमुख म्हणून प्रसन्ना कदम, अभिजित लाटे व अमोल वऱ्हाडे जबाबदारी सांभाळणार आहेत.
ध्वनी व्यवस्था प्रमुख म्हणून लंकेश बेले व राहुल चव्हाण, तर शिस्त व सुरक्षा प्रमुख म्हणून सूरज गायकवाड व विशाल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वयंसेवक प्रमुख म्हणून बालाजी मोरे, महेश घोडके व रिकी पिस्के यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विविध सांस्कृतिक उपक्रमांची मेजवानी
यंदाच्या गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन, नृत्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे व्यासनगरातील गणेशोत्सवाला यंदा सांस्कृतिक रंगत आणि सामाजिक उपक्रमांची जोड मिळणार आहे.
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व समिती प्रमुखांचे मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी एकजुटीने योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 



 
Top