नळदुर्ग व्यापारी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी  आनंद काटकर, उपाध्यक्षपदी दयानंद गव्हाणे, ओमकार महाबोले; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

नळदुर्ग, दि. २४ ऑगस्ट : 

नळदुर्ग शहरातील व्यापारी गणेश मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची शनिवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी  आनंद काटकर, तर उपाध्यक्षपदी दयानंद गव्हाणे व ओमकार महाबोले यांची निवड झाली.

सचिवपदी सुधीर पाटील, तर कोषाध्यक्षपदी वैजनाथ कोरे यांची निवड करण्यात आली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या बैठकीस व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले, कार्याध्यक्ष मुकुंद नाईक, ज्येष्ठ व्यापारी दयानंद स्वामी, सुभाष कोरे, संतोष मुळे, मल्लीनाथ शिरगुरे, कल्लप्पा कलशेट्टी, सुजीत बिराजदार, वीरभद्र बेडगे, गणेश किल्लेदार यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणीचे उपस्थित व्यापारी बांधवांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्री गणरायाच्या आशीर्वादाने मंडळाच्या माध्यमातून शहरात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना नवी दिशा मिळावी आणि मंडळाची वाटचाल यशस्वी व प्रेरणादायी ठरावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
 
Top