सरदारसिंग ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांकडून जंगी सत्कार; कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

नळदुर्ग, दि. १ ऑगस्ट :

शेतकरी संघर्ष समितीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तुळजापूर तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत त्यांच्या सामाजिक, संघटनात्मक व शेतकरीहिताच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, नगरपालिकेतील गटनेते मारुती खारवे, नगरसेवक सुधीर पोतदार, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, फारुख कुरेशी, शहरप्रमुख संतोष पुदाले, शाम कनकधर, दत्तात्रय वाघमारे, नेताजी महाबोले, सोमनाथ म्हेत्रे यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, तालुका प्रमुख व्यंकट पाटील, पंडित पाटील, महेश घोडके, गुलाब शिंदे, आजमोद्दीन शेख, पिरपाशा इनामदार, रहीमान शेख, दिलीप पाटील, बालाजी ठाकूर, काशिनाथ काळे, बंडू मोरे, तोलू पाटील, मानसिंग ठाकूर, छोटूसिंग ठाकूर, रामसिंग ठाकूर, पृथ्वीराज ठाकूर, अरुण ठाकूर, राजू ठाकूर, बबन कांबळे आदी उपस्थित होते.

सत्कारानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संतोष पुदाले, सुधीर पोतदार, विनायक अहंकारी, मारुती खारवे, महेश घोडके आणि दिलीप जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणातून त्यांनी सरदारसिंग ठाकूर यांच्या शेतकरी प्रश्नांवरील सातत्यपूर्ण लढाऊ भूमिकेचा, संघटन कौशल्याचा, साध्या स्वभावाचा आणि पक्षनिष्ठेचा विशेष गौरव केला. समाजहित व शेतकरी हितासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी सरदारसिंग ठाकूर यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
Top