धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीशैल स्वामी, कोषाध्यक्षपदी सोहम कासार यांची बिनविरोध निवड
नळदुर्ग, दि. १५ ऑगस्ट :
नळदुर्ग शहरातील धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीशैल विरय्या स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, नव्या कार्यकारिणीकडून यंदाचा गणेशोत्सव सामाजिक उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी भावेश जाधव व ओंकार महाबोले, सचिवपदी हर्ष जाधव, सहसचिवपदी रोहित वाले, कोषाध्यक्षपदी सोहम कासार, लेझीम प्रमुखपदी सुरज चव्हाण, प्रसिद्धी प्रमुखपदी विनायक अहंकारी, तर मिरवणूक प्रमुखपदी संजय जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी तेजस जाधव, आकाश सुरवसे, दिनेश डोंगरे, संकेत भुमकर, संकेत स्वामी, ऋषी बाळुरकर, रोहन स्वामी, तात्या हिल्लाळ, सनी भुमकर, श्रेयस स्वामी, संतोष वाले, अक्षय जगदाळे, सुनिल गव्हाणे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. आगामी गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात, शिस्तबद्ध नियोजनासह आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.