स्वातंत्र्य दिनानिमित्त चिमुकल्यांना खाऊ ,  गणवेशाची भेट ; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला

नळदुर्ग, दि. १५ ऑगस्ट : 

प्रभाग क्रमांक १०च्या नगरसेविका कु. साक्षी किशोर नळदुर्गकर यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भीमनगर येथील रमाई अंगणवाडी क्रमांक २ मधील चिमुकल्या बालकांना खाऊ आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी सौ. रंजना गायकवाड, अंबाबाई मोहन बनसोडे, अनिता वाघमारे, प्रज्ञा कांबळे, खाजाबी शेख, रूपाली सोनवणे, अंगणवाडी सेविका छाया जाधव, सुनिता इंगोले आदी उपस्थित होते.
 
Top