भोईराज गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी आदित्य सिद्धे तर उपाध्यक्षपदी अमर डुकरे, चंदन पुदाले; गणेशोत्सवाच्या नियोजनाला वेग

नळदुर्ग, दि. ३० ऑगस्ट :

भोईराज सांस्कृतिक तरुण गणेश मंडळाच्या आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली. गणेशोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासोबतच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
मंडळाच्या अध्यक्षपदी आदित्य सिद्धे, उपाध्यक्षपदी अमर डुकरे व चंदन पुदाले यांची निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्षपदी अमित दासकर, सचिवपदी प्रवीण दासकर, सहसचिवपदी धनंजय डुकरे, तर लेझीम प्रमुखपदी अमोल दासकर यांची निवड झाली. याशिवाय अजय डुकरे व रोहित डुकरे यांचीही पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी झालेल्या बैठकीस अमृत पुदाले, दीपक डुकरे, सुनील उकंडे, भानुदास पुदाले, महेंद्र डुकरे, अजय दासकर, संजय डुकरे, संतोष पुदाले, रवी सुरवसे, गणेश पुदाले, किरण डुकरे, अक्षय भोई, प्रशांत पुदाले, सचिन भोई, विशाल डुकरे आदी सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन केले. आगामी गणेशोत्सवात भक्तिमय वातावरणासह सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
 
Top