महाराणा प्रताप गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर; अरुणसिंह ठाकूर अध्यक्षपदी
नळदुर्ग, दि. २४ ऑगस्ट :
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग येथील महाराणा प्रताप गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी अरुणसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मंडळाच्या उपाध्यक्षपदी आकाश पुदाले व अमर बिसेनी, कोषाध्यक्षपदी अभिषेक आवटे व शिवा लामजाने, सचिवपदी अजय ठाकूर व संतोष गहेरवार, तर खजिनदारपदी महेश हजारी व शुभम हजारी यांची निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे, यंदाची श्रींची गणेशमूर्ती महेश हजारी यांनी दिली आहे. त्यामुळे मंडळाच्या गणेशोत्सवाला यंदा विशेष आकर्षण राहणार आहे.
गणेशोत्सवातील मिरवणुकीची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. राजपूत समाजाचे अध्यक्ष सुधीरसिंह हजारी, युवा अध्यक्ष मनीषसिंह हजारी, समाजाचे उपाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर यांच्यासह दिलीपसिंह ठाकूर, अतुल हजारी, राहुल हजारी, सागर हजारी, किरणसिंह ठाकूर, राजू ठाकूर, अजित हजारी, अमोल हजारी, मानसिंग ठाकूर, अमोल बिसेनी, संदीप हजारी, अरुण नाईक, सौरभ गहेरवार, सनी हजारी, अक्षय हजारी, शुभम हजारी व अजमेर शेख आदी उपस्थित होते.
नव्या कार्यकारिणीने गणेश उत्सव उत्साहात, शिस्तबद्ध आणि सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.