नळदुर्ग शहरातील गणरायाच्या चरणी आमदार राणाजगजितसिंह पाटील;
सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी,
गणेशभक्तांशी साधला संवाद; महेश हजारे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
नळदुर्ग, दि. २० सप्टेंबर :
ऐतिहासिक नळदुर्ग शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शनिवारी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्तांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार पाटील यांनी महाराणा प्रताप तरुण गणेश मंडळ, शिवनेरी तरुण गणेश मंडळ (अयोध्यानगर), जय हिंद तरुण गणेश मंडळ (व्यासनगर), जय हनुमान तरुण गणेश मंडळ (शास्त्री चौक), व्यापारी गणेश मंडळ, जवाहर तरुण गणेश मंडळ, धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ, भोईराज गणेश मंडळ, शिवशाही तरुण गणेश मंडळ (मराठा गल्ली), जय बजरंग तरुण गणेश मंडळ (दुर्गानगर) तसेच श्री सेवा सार्वजनिक गणेश मंडळ (वसंतनगर) येथे भेटी दिल्या.
यावेळी सर्व मंडळांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. आमदार पाटील यांनी श्री गणरायाची आरती करून सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्तांशी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.
दरम्यान, महाराणा प्रताप तरुण गणेश मंडळाचे कार्यकर्ते महेश (गोलू) हजारे यांचा वाढदिवस असल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पाटील यांनी हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या भेटीप्रसंगी नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, जिल्हा परिषद बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे, पंचायत समिती सदस्य रणवीर चव्हाण, नगरसेवक दत्तात्रय दासकर, तानाजी जाधव, शशिकांत पुदाले, निरंजन राठोड, सुशांत भूमकर, माजी नगरसेवक महालिंग स्वामी, युवा उद्योजक मनिष हजारे, सुधीर हजारे, अतुल हजारे, अरुण ठाकूर, प्रशांत भूमकर, आदित्य सिद्धे, अमित दासकर, रविराज कलशेट्टी, वीरेंद्र बेडगे, सचिन बेडगे, आप्पी स्वामी, अभिजीत लाटे, सुदर्शन पुराणिक, नितीन कुलकर्णी, विश्वजीत भुसारे, सुरज गायकवाड, सुनील (बबन) चौधरी, अमित मारेकर, तुळशीदास गव्हाणे, स्वप्निल काळे, किरण पाटील, मल्हारी कोकरे, श्रीशैल स्वामी, अतुल डोंगरे, सतीश जाधव, सनी भूमकर, भावेश जाधव, ओंकार महाबोले, गणेश मोरडे, मुकुंद नाईक, पिंटू मोरे, गजानन हळदे, शंकर वाघमारे, बलदेव ठाकूर, पद्माकर घोडके, महादेव वाघमारे, विजय ठाकूर, मारुती घोडके, शिवाजी सुरवसे, सुहास येडगे, प्रदीप चौधरी, युवराज जगताप, विलास येडगे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.