जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नळदुर्गच्या मल्लांची दमदार बाजी; अथर्व कांबळे, बसवराज कलशेट्टी व शिवराज पाटील यांची विभागीय स्तरावर निवड

नळदुर्ग, दि. २७ सप्टेंबर :

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या मल्लांनी दमदार कामगिरी करत तीन सुवर्णवेध घेतले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अथर्व कांबळे, बसवराज कलशेट्टी आणि शिवराज काकासाहेब पाटील यांची विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेत अथर्व कांबळे याने ६२ किलो ग्रीको-रोमन वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. बसवराज कलशेट्टी याने ९२ किलो फ्रीस्टाईल गटात अव्वल स्थान मिळविले. तसेच शिवराज काकासाहेब पाटील याने ६५ किलो ग्रीको-रोमन गटात प्रथम क्रमांक मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.

तीनही मल्लांनी जिल्हास्तरावर केलेल्या दमदार कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता विभागीय स्तरावरील स्पर्धेतही या मल्लांकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.विजेत्यांना  प्रा.कपील सोनटक्के यांचे 
मार्गदर्शन लाभले.त्यांच्या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , उपाध्यक्ष, डॉ अभय शहापूरकर, सचिव   उल्हास बोरगांवकर, रामचंद्र आलुरे, प्राचार्य डॉ सुभाष राठोड, उपप्राचार्य, व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा- यांनी अभिनंदन  करून पुढील वाटचालीस  शुभेच्छा दिल्या.
 
Top