खो-खोच्या मैदानात नळदुर्ग महाविद्यालयाची दमदार झेप!
अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत विद्यापीठस्तरीय द्वितीय क्रमांकावर मोहोर

नळदुर्ग, दि. २८ सप्टेंबर :

पाटोदा (जि. बीड) येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विद्यापीठस्तरीय द्वितीय पारितोषिक पटकाविले. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली. खेळाडूंच्या वेगवान हालचाली, अचूक डावपेच आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर संघाने अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारत द्वितीय क्रमांक मिळविला.

 खो खो  विजयी संघात राज जाधव, सुधीर जाधव, अमर चव्हाण, भूषण पवार, तेजस पाटील, आकाश राठोड, राहुल चव्हाण, श्रीशंभो पेठे, जनार्दन सावंत, धन्यकुमार चव्हाण यांच्यासह अन्य खेळाडूंचा समावेश होता.

या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव उल्हास बोरगांवकर, कोषाध्यक्ष रामचंद्र आलुरे, संचालक बाबुराव चव्हाण, प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ. अशोक कदम, मार्गदर्शक डॉ. कपिल सोनटक्के, कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

खेळाडूंनी आगामी स्पर्धांमध्येही सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करावी, यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top