अंबाबाई देवस्थानच्या ‘होम मिनिस्टर’मध्ये आकांक्षा कुलकर्णी प्रथम
सोनाली मोटे यांना द्वितीय क्रमांक; मानाच्या पैठणीने विजेत्यांचा सन्मान
नळदुर्ग, दि. १८ ऑक्टोंबर :
श्री अंबाबाई देवस्थान ट्रस्ट व जीर्णोद्धार समितीच्या वतीने शनिवारी दि.१७ ऑक्टोंबर रोजी नवरात्रोत्सवातील सातव्या माळेनिमित्त महिलांसाठी आयोजित ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सौ. आकांक्षा कुलकर्णी यांनी प्रथम, तर सौ. सोनाली मोटे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मंदिर ट्रस्टच्या वतीने विजेत्यांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगीता चनशेट्टी व सौ. वर्षा देवकते यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी नगरसेविका मीनाक्षी काळे, सौ. वैशाली उकंडे, सौ. मीनल कासार व सौ. परळकर यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन मंदिर ट्रस्टचे सुरेश गायकवाड, जीर्णोद्धार समितीचे सदस्य सरदारसिंग ठाकूर, सुनील उकंडे, दत्तात्रय वाघमारे, शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले, उपशहरप्रमुख सोमनाथ म्हेत्रे व नेताजी महाबोले यांनी केले. नवरात्रोत्सवाच्या उत्साहात रंगलेल्या या स्पर्धेमुळे महिलांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली.