संत रामराव बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त २५ व २६ ऑक्टोबरला धार्मिक कार्यक्रम
पोहरादेवी येथे बंजारा भजन, भोगपूजा आणि महाप्रसादाचे आयोजन

धाराशिव ,दि.२३ ऑक्टोंबर: 

धर्मगुरू, तपस्वी आणि बालब्रह्मचारी संत रामराव बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त तीर्थक्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशिम) येथे रविवार, दि. २५ आणि सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी बंजारा भजनाचा कार्यक्रम होणार असून, रात्री १२ वाजता भोगपूजा करण्यात येणार आहे. सोमवारी, दि. २६ ऑक्टोबर रोजी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत रामराव बापू यांच्या समाधीस्थळी होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन राज्याचे मृद संधारण मंत्रीना. संजय राठोड यांचे समर्थक सचिन राठोड यांनी केले आहे .

धर्मगुरू डॉ. संत रामराव बापू महाराज यांचे नातू महंत देवीभक्त शेखर महाराज यांच्या विनंतीवरून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संत रामराव बापू समाधीस्थळ, तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे हा सोहळा पार पडणार आहे.

 
Top