स्वच्छतादूत महिलांना भाऊबीजेची अनोखी भेट; ८० महिलांना साडीवाटप
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम; युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते सन्मान

नळदुर्ग, दि. ११ नोव्हेंबर : 

शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या स्वच्छतादूत महिला भगिनींच्या कार्याचा गौरव करत भाऊबीजेनिमित्त त्यांना साडी भेट देऊन अनोख्या पद्धतीने सन्मानित करण्यात आले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमांतर्गत नळदुर्ग नगरपालिकेतील ८० महिला सफाई कर्मचाऱ्यांना युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.
नळदुर्ग नगरपालिकेत झालेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यर जागीरदार, जिल्हा परिषद सदस्य सुनील बनसोडे, नगरसेवक इमाम शेख, निरंजन राठोड, आकाश कुलकर्णी, सुधीर पोतदार, गफूर कुरेशी, सुशांत भूमकर, किशोर नळदुर्गकर, सईद बागवान, प्रवीण गायकवाड, बलदेवसिंग ठाकूर, तसेच नगरसेविका राणी सुरवसे, मीनाक्षी काळे, अपर्णा बेडगे, छमाबाई राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी मल्हार पाटील यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने परिश्रम घेणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. शहराच्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा खरा आधार असलेल्या या महिलांच्या योगदानाची दखल घेणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व महिला भगिनींना दीपावली व भाऊबीजेच्या शुभेच्छाही दिल्या.

कार्यक्रमास माजी नगरसेवक विनायक अहंकारी, जिलानी कुरेशी, सिकंदर काझी, शिवाजी सुरवसे, सुनील उकंडे, विनायक पुदाले, अभिजित लाटे, पप्पू पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पाणीपुरवठा सभापती तानाजी जाधव यांनी केले.

Recent News

 
Top