मनःशांती आणि आनंदासाठी नळदुर्गात आजपासून ‘हॅप्पीनेस कोर्स’
आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे १३ ते १८ नोव्हेंबर दरम्यान आनंद उत्सव शिबिर; योग, ध्यान आणि सुदर्शन क्रियेचे मिळणार मार्गदर्शन
नळदुर्ग, दि. १२ नोव्हेंबर :
धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणतणाव दूर करून मनःशांती, सकारात्मकता आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने नळदुर्ग येथे ‘हॅप्पीनेस कोर्स – आनंद उत्सव’ या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या आशीर्वादाने दि. १३ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत बालाघाट कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हे शिबिर होणार आहे.
या सहा दिवसीय शिबिरात योग, प्राणायाम, ध्यान, ज्ञान तसेच जगप्रसिद्ध श्वसन तंत्र असलेल्या ‘सुदर्शन क्रिये’चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करणे, मन प्रसन्न ठेवणे, आत्मविश्वास वाढविणे आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शिबिराची सकाळची बॅच दररोज सकाळी ६ ते ८.३० या वेळेत होणार आहे. मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुकांनी वेळेत नोंदणी करून या आनंद अनुभूती शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी अविनाश धरणे (७९७२६७०४९२), लक्ष्मण नरे (९९२२२९७३२०), कमलाकर घुगे (७७०९२७०९९९) व ज्ञानेश्वर मोकाशे (९०४९३३९८३३) यांच्याशी संपर्क साधावा. ऑनलाइन नोंदणीसाठी https://aolt.in/1072399 या लिंकचा वापर करावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे लक्ष्मण नरे व परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.