नळदुर्गात दिवाळीनिमित्त म्हशी पळवण्याची पारंपरिक स्पर्धा उत्साहात!
खांड व एकल म्हैस स्पर्धेत ५१ पशुमालकांचा सहभाग; विजेत्यांना शिल्ड, कप व पशुखाद्य देऊन गौरव
नळदुर्ग, दि. १२ नोव्हेंबर :
दिवाळी सणानिमित्त नळदुर्ग शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी पारंपरिक म्हशी पळवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खांड म्हशी पळवणे आणि एकल (सिंगल) म्हैस पळवणे अशा दोन प्रकारांत झालेल्या या स्पर्धेत नळदुर्गसह चव्हाणवाडी, जखनी तांडा, मुर्टा, अणदूर, केशेगाव, कसई, कासेगाव,सोलापूर आदी ठिकाणांहून सुमारे ५१ पशुमालकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
खांड म्हैस स्पर्धेतील विजेते
खांड म्हैस पळवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक अजय राजेंद्र जाधव (नळदुर्ग) यांनी पटकावला. कै. सचिन कमलाकर चव्हाण यांच्या स्मरणार्थ कमलाकर चव्हाण यांच्याकडून शिल्ड व कप, तर नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्याकडून सरकी पेंडचे एक पोते देण्यात आले.
द्वितीय क्रमांक सोमनाथ शिवाजी पवार (नळदुर्ग) यांनी मिळविला. कै. विजयकुमार धरणे यांच्या स्मरणार्थ बसवराज धरणे यांच्याकडून शिल्ड व कप, तर अॅड. अरविंद बेडगे यांच्याकडून गव्हाच्या भुशाचे एक पोते देण्यात आले.
तृतीय क्रमांक लक्ष्मण करदुरे (मुर्टा) यांनी पटकावला. कै. अप्पाराव शंकरराव बेडगे यांच्या स्मरणार्थ अरविंद बेडगे यांच्याकडून शिल्ड व कप, तर नगरसेवक आकाश दिलीपराव कुलकर्णी यांच्याकडून गव्हाच्या भुशाचे एक पोते देण्यात आले.
एकल म्हैस पळवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक रजाक शेख यांनी मिळविला. कै. नितीन राजकुमार धरणे यांच्या स्मरणार्थ बसवराज धरणे यांच्याकडून शिल्ड व कप, तर धनंजय कुलकर्णी यांच्याकडून सरकी पेंडचे एक पोते देण्यात आले.
द्वितीय क्रमांक जफर टेलर (नळदुर्ग) यांनी पटकावला. संतोष पुदाले यांच्याकडून शिल्ड व कप, तर रोहित रंगनाथ डुकरे यांच्याकडून गव्हाच्या भुशाचे एक पोते देण्यात आले.
तृतीय क्रमांक विजय अवचार (नळदुर्ग) यांनी मिळविला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर शाखेतर्फे शिल्ड व कप, तर तन्वीर कुरेशी यांच्याकडून गव्हाच्या भुशाचे एक पोते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कै. सुधाकर चव्हाण यांच्या स्मरणार्थ प्रवीण चव्हाण यांच्यातर्फे स्पर्धेत सहभागी पशुमालकांना प्रत्येकी तीन लिटर दूध मावेल अशा कॅनचे वाटप करण्यात आले.
आमदार प्रवीण स्वामी यांची भेट
या पारंपरिक स्पर्धेला उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी भेट देऊन आयोजक व सहभागी पशुमालकांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे नेते मल्हारदादा पाटील यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष शाहेबाज काजी, माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, अमृत पुदाले, नगरसेवक आकाश कुलकर्णी, मारुती खारवे, इमाम शेख, सुधीर पोतदार, डॉ. सत्यजित डुकरे, शहरप्रमुख संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे पंच म्हणून अजय जाधव, जफर टेलर, पिल्लू मुळे, तानाजी जाधव व उत्तम जाधव यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कमलाकर चव्हाण, संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकूर, शाम कनकदार, दत्तात्रय वाघमारे, सोमनाथ मेहत्रे, प्रवीण चव्हाण, नेताजी महाबोले, ओंकार कलशेट्टी, सगरे, कदम, राजू ठाकूर, श्रीकांत डुकरे, नागनाथ कलशेट्टी आदींनी परिश्रम घेतले.
दिवाळीच्या निमित्ताने आयोजित या पारंपरिक स्पर्धेमुळे नळदुर्गच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. पशुमालकांचा उत्साह आणि नागरिकांची उपस्थिती यामुळे स्पर्धेचे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.