Saturday, 24 August 2013

मातंग समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील : ना. चव्हाण

नळदुर्ग -: मातंग समाजाच्या विकासासाठी आपण गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील असून अनेक कल्याणकारी योजना समाजासाठी मिळवून दिले आहे. यापुढेही मातंग समाजाच्या विकासासाठी सर्वोत्तोपरी सहकार्य करुन भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी दिले.
नळदुर्ग येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. मधुकरराव चव्हाण हे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष शब्बीरअली सावकार, उपनगराध्यक्षा अपर्णा बेडगे, नगरसेवक शहबाज काझी, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कांबळे, अशोक जाधव, किशोर साठे, विलास डोलारे, प्रमोद कांबळे, सत्यवान भोवाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रांरभी शहरातून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अण्णाभाऊच्या प्रतिमेचे पूजन ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. मातंग समाज तरुण मंडळाच्यावतीने सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती समितीचे अध्यक्ष बाबा काळे, तानाजी वाघमारे, यल्लाप्पा काळे, महादेव काळे, धनराज गायकवाड, सुभाष गायकवाड, अजय गायकवाड, नवनाथ काळे, नारायण हजारे, सुरज देडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभार मातंग समाजाचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी केले.

Labels: