Tuesday, 28 January 2014

संभाजीराजेंच्‍या हस्ते बार्शीतील छत्रपती संभाजीराजे चौक नामकरण फलकाचे अनावरण

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील शासकिय तंत्रनिकेतन (आय.टी.आय.) जवळील चौकास छत्रपती संभाजीराजे चौक असे नामकरण करण्यात आले असून याचे अनावरणही युवराज संभाजीराजे भोसले (कोल्हापूर) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
      संभाजी ब्रिगेड आणि बार्शी नगरपरिषदेने संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दि.२६ जानेवारी रोजी हा कार्यक्रम पार पडला यावेळी. यावेळी नगराध्यक्ष कादर तांबोळी, राष्ट्रवादी नगरसेवकांचे गटनेते नागेश अक्कलकोटे,रमेश पाटील, देविदास शेटे, बप्पा कसबे, अंबादास शेटे, रामभाऊ मेनकुदळे, आनंद काशीद आदी उपस्थित होते.

Labels: