बार्शी : माणसांना अनेक आजार हे अशुध्द पाण्यामुळेच होतात, ग्रामीण भागात तर बहुतांश नागरीक अशुध्दच पाणी पितात, त्यामुळेच स्वयंसेवी संस्थांनी ही बाब गांभीर्याने घेत ग्रामीण भागात शुध्द पाण्याचे प्रकल्प उभा करण्याचा स्तुत्य आहे़ अशा प्रकल्पामुळे पाण्याबरोबरच नागरीकांची मने देखील स्वच्छ होतील असे प्रतिपादन डॉ़ सुनिल पाटील यांनी केले़.
    खामगाव येथे मातृभुमी प्रतिष्ठाणच्या वतीने शुध्द पाणी जागृती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते़. अध्यक्षस्थानी शिवाजी ग्राम कृषि मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर डमरे हे होते़ यावेळी शिवाजी पवार, रोटरीचे अध्यक्ष गौतम कांकरिया, मातृभुमी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सचिव प्रतापराव जगदाळे, सदस्य मुरलीधर चव्हाण, शहाजी फुरडे-पाटील, माजी सभापती युवराज काटे, सरपंच सुरज नलगे, कैलास मडके,शुध्द पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष काकासाहेब झांबरे, महादेव पाटील आदी उपस्थित होते़
    डॉ़ पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात आजही मुलभुत सोयीसुविधांची वानवा आहे़ आपण रोज जे पाणी पितो ते आपल्याला वरुन शुध्द आहे असे वाटते मात्र ते तसे  सते, त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात, त्यामध्ये कॉलरा हा मुख्य आजार आहेक़ॉलºयाबरोबरच काविळ, टॉयफॉइड, व आतड्याचे साठ प्रकारचे आजार होतात़ नागरिकांनी  जार झाल्यावर काळजी घेण्यापेक्षा पुर्वीच घेतलेले चांगले़ असे सांगून मातृभुमी प्रतिष्ठाण ने शुध्द पाणी नव्हे आरोग्याची गंगा गावात आणली असल्याचे पाटील म्हणाले़ शिवाजी पवार यांनी आज आपण नको त्या ठिकाणी कितीतरी पैसा खर्च करतो, मात्र पाण्याच्या बाबतीत आपण दक्ष नाही़ शुध्द रहाणे व चांगले खाणे हे महत्वाचे आहे़ आपण तंदुरुस्त असणे हे सर्वात महत्वाचे असून तंदुरुस्त असल्याशिवाय कांहीच करु शकणार नाही, त्यासाठी शुध्द पाणी पिणे गरजेचे आहे़ रोटरी क्लब, मातृभुमी प्रतिष्ठाण यासारख्या संस्था यासाठी  पुढे आल्या ही बाबत कौतुकास्पद आहे़ नागरीकांनी या शुध्द पाण्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पवार यांनी केले़ प्रास्ताविकात प्रतापराव जगदाळे यांनी  मातृभुमी प्रतिष्ठाण विषयी तसेच शुध्द पाण्याच्या प्रकल्पाविषयी माहिती दिली़ सुत्रसंचलन काकासाहेब झांबरे यांनी केले़ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम नलगे, यशवंत मुठाळ, सुभाष ठोंबरे, तानाजी लोखंडे, सुधाकर करंडे, आण्णासाहेब उघडे, सचिन काटे, शंकर देशमुख, हरिश्चंद्र मुठाळ, बापूसाहेब नाईकनवरे, बाळासाहेब लोखंडे,शरद खंदारे, संतोष कंगले, यांनी परिश्रम घेतले़.
    बार्शी शहर व तालुक्यातील उद्योग, व्यवसाय,पत्रकारिता , प्रशासन आदीसह विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या तसेच ज्यांना समाजकार्यांची आवड आहे अशा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मातृभुमी प्रतिष्ठाणची स्थापना केली आहे़ नौकरीनिमीत्त आपण जरी आपल्या गावापासून बाहेर असलो तरी आपल्या मातृभुमीची सेवा करणे या एकमेव उद्देशाने या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
    पहिल्या वर्षी आर ओ प्लँट बसवून शुध्द पाण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी खामगाव, घारी, घाणेगाव, आगळगाव व इर्ले या गावांची निवड करण्यात आली आहे़ यामध्ये गावात सौरदिवे बसवणे, प्राथमिक शाळेसाठी मनोरंजनाची खेळणी बसवणे, आदी प्रकल्प मातृभुमी प्रतिष्ठाण, रोटरी क्लब, कृषी पदवीधर संघटना व गावकºयांचा लोकसहभाग यामधून बसवण्यात येणार आहेत.
 
Top