उस्मानाबाद :- नवयुवकात जिद्य निर्माण होण्यासाठी त्यांचे मनोबल उंचावणे आवश्यक आहे. युवकानी कामात सातत्य ठेवून सदैव कार्यरत राहील्यास  यश हमखास मिळते. कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी युवकातील सुप्त गुणांना चालना देणे आवश्यक असते. काम करताना कधी हार होते तर कधी जीत होते, त्यासाठी काम करताना सातत्य आणि परिश्रम आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यानी युवा मेळाव्याप्रसंगी बोलातना केले.
       नेहरु युवा केंद्र, युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील युवक व युवती यांच्या नेहरु युवा संघटना यांच्यासाठी जिल्हास्तरीय युवक मेळावा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हास्तरीय युवक मेळाव्याचे आयेाजन करण्यात त्याप्रसंगी डॉ. नारनवरे  बोलत होते.
    यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  सुमन रावत, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर  जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, महाराष्ट्र व गोवा राज्याचे  क्रीडा संचालक श्री. पांडे, प्रा. जर्रा काझी, आदि अधिकारी उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, नवयुवकात जिद्य निर्माण होण्यासाठी त्यांचे मनोबल उंचावणे आवश्यक आहे. युवकानी कामात सातत्य ठेवून युवकातील सुप्त गुणांना अशा मेळाव्याव्दरे चालना देण्यात येते. आजचे युवक-युवतीं हे भावी भारताचे भाग्यविधाते असल्याने  त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देवून येणाऱ्या अडी-अडचणीमध्ये त्यांच्या  पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असेही त्यांनी सांगितले.
युवा शक्तीत खुप मोठी ताकद असते. त्याचा उपयोग युवकांनी आपल्या गावी  जावून गट तयार करावे व आपणास जो कोणता उद्योग व्यवसाय करावयाचा त्या व्यवसायाची निवड करावी. त्यासाठी आवश्यक असणारे सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.युवकांनी आपल्या गावच्या विकासासाठी गाव हांगणदारीमुक्त व दारुबंदीचे काम हाती घेवून प्रथम या कार्याचा प्रारंभ करावा. सध्या मदय प्राशन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यांना सुधारण्यासाठी एका साफटवेअरची निर्मीती केली जाणार असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
      गाव तेथे घर, घर तेथे स्वच्छतागृह असलीच पाहिजे, आपण 50 हजाराच्या मोटार सायकलवर बसून गुडमॉर्निंग पथकाच्या हाती लागू नये, म्हणून गावापासून दूर जातो, परंतु आपल्या घरात स्वच्छतालय बांधु शकत नाही, ही खरी शोकांतीका आहे. महिला सक्षमीकरण व सुरक्षितता हा देखील कार्यक्रम हाती  घेण्यात येणार असून विकास कामात सहभागी होणाऱ्यासाठी विकासकार्ड  देण्यात येणार असल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
    यावेळी अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील म्हणाले की, जिल्हाधिकारी यांच्या स्वयंपूर्तीमधून हा जिल्हास्तरीय युवा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत म्हणाल्या की, सन 2020 मध्ये भारत देश युवा होईल. युवक-युवतीनी शिक्षणात प्रगती करावी. युवकानी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाचे नियेाजन केल्यास यश प्राप्त होते असेही, त्या म्हणाल्या.
    संचालक पांडे म्हणाले की, असा हा युवक मेळावा महाराष्ट्रात प्रथमच जिल्हाधिकारी डॉ. प्रशात नारनवरे यांच्या प्रेरणेने घेतला गेला आहे. या मेळाव्याच्या प्रशिक्षणासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
    सचिन पाटील म्हणाले की, देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी सुशिक्षित होणे व एकत्रित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी मार्ग निवडा, दिशा ठरवा, प्रत्येकवेळी आपल्या कार्यात सातत्य ठेवा,आयुष्यात चांगल्या लोकांची संगत करा. प्रामाणिकपणे काम करा, आपले आयुष्य परीक्षा पाहत असते, कधी अपशय आले म्हणून निराश  न  होता यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील रहा. आजच्या  माहिती व तंत्रज्ञान युगात आजची नवीन पिढी वावरत आहे, या तंत्रज्ञानाचा सदुपयोग करा. व अफवांवर विश्वास ठेवू नका.प्रत्येक वेळी संयमाने वागा, असा अनमोल सल्ला त्यांनी दिला.  
    डॉ. काझी म्हणाले की, युवकांनी जीवनात कसे जगावे व जगून यशस्वी कसे व्हावे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, लिड बँकेचे मॅनेजर भिमराव दुपारगुडे, महाराष्ट्र उदयोजक विकास मंडळाचे श्री. मोरे, डॉ. तांबारे, बालाजी पवार यानी देखील मार्गदर्शन केले.
        नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक मोहन गोस्वामी यांनी  जिल्हा युवा केंद्राची पार्श्वभुमी स्पष्ट केली. या मेळाव्याचे दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यास जिल्ह्यातून युवक, युवती, महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नेहरु युवा केंद्राचे समन्वयक सहायक विकास कुलकर्णी यानी केले.  
 
Top