Wednesday, 24 September 2014

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

उस्मानाबाद - जिल्ह्यात आगामी नवरात्र उत्सव, विधानसभा निवडणूक व बकरी ईद तसेच दाहशतवादी कारवाया अनुषंगाने अपर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी   मुंबई  फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये  संपूर्ण जिल्ह्यात दि. 23 सप्टेंबरच्या सकाळी 5 पासून ते दि. 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतीबंधात्मक  आदेश जारी  करण्यात आले आहे.
  दहशतवादी कारवाया करणारे व्यक्ती खोटया नावाने भाडयाने खाजगी जागा/भाडे तत्ववार घर /लॉज घेवून दहशतवादी कारवाया करण्याची शक्यता आहे. भाडयाने राहणाऱ्या अशा व्क्तीची नेांद त्यांचे ओळखपत्र व निवासाच्या पत्यासह संबंधित पोलीस स्टेशनला सादर करणे आवश्यक आहे. दुय्यम प्रतीचे मोटार वाहन विक्री/ खरेदी करणारे लोकांकडून अनाधिकृतपणे व्यवसाय करुन वाहने स्फोटात वापरण्याची शक्यता आहे. आक्षेपार्ह सीडी/ गाणे वाजविल्याने जातीय-धार्मिक तेढ निर्माण होवून तंटे निर्माण होण्याची शक्यता आहे. सायबर कॅफेचा अनाधिकृतपणे वापर, बोगस नावाने सीमकार्ड खरेदी विक्री  आदि व्यवहार करुन कायदा व सुव्यस्थेचा  प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घातपात होण्याची  किंवा  बिघडयाची शक्यता असल्याने जिल्ह्यात प्रतिबंधात्मक  मनाई आादेश  लागू करण्यात आले आहे.
कोणत्याही व्यक्तीला घर ,दुकाने, जागा किरायाणे/ भाडयाने ठेवताना घरमालक, लॉजचालक, धर्मादाय संस्था, विश्रामगृह, धर्मशाळा चालक/ मालकांनी वास्तव्यास राहणारे व्क्तीचे ओळखपत्र व निवासाचा पत्ता याबाबत माहिती संबंधित पेालीस स्टेशनला न देता किरायाणे ठेवण्यासही  मनाई करण्यात आली आहे. तसेच  सिडी /गाणे वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे.
सायर कॅफे चालकांनी आपली ओळख पटविल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस सायबर कॅफेचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून अनेाळखी व ज्याची ओळख पटवू शकत नाही अशा व्यक्तीस सीमकार्ड विक्री करण्यासही मनाई करण्यात आली आहे. संबधितानी याची नोंद घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

Labels: