Wednesday, 24 September 2014

चार दिवस मदय विक्रीस बंदी

    उस्मानाबाद - तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. असून तुळजापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील नियम 142( 1) अन्यवये गुरुवार,    दि. 25 सप्टेंबर रोजी  घटस्थापना, 3 ऑक्टोबर रोजी होमावर धार्मिक विधी , 4 ऑक्टोबर रोजी विजयादशमी आणि 7 ऑक्टोबर रोजी अश्विनी पोर्णिमा सणानिमित्त उस्मानाबाद जिल्हयातील सर्व देशी दारु दुकाने,ताडी विक्री केंद्र, परवानाकक्ष,अनुज्ञप्ती, एफएलबिआर-2 (बिअर शॉप) दुकाने बंद ठेवण्याचे व मदय विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.                       

Labels: