![]() |
| मारुती बनसोडे |
नळदुर्ग :- नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी (एनएसपी) होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 40 जागा स्वबळावर लढविणार असल्याची माहिती एनएसपीचे नवनिर्वाचित प्रदेश प्रदेश सरचिटणीस मारुती बनसोडे यांनी दिली.
लोणावळा पुणे येथील एनएसपीच्या केंद्रीय कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जी.बी. कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली असून सदर निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष जी.बी. कडू, महासचिव शशिकांत जाधव यांनी दिले आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सामान्य बहुजनातील सर्वोत्तोपरी उपेक्षित असलेल्या लोकांच्या शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची कोंडी फोडण्यासाठी व महाराष्ट्रातील जनतेला योग्य ते न्याय देण्यासाठी होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत नवबहुजन समाज परिवर्तन पार्टीच्यावतीने ठराविक 40 जागा स्वबळावर लढविणार असून पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, मुंबई सह महाराठवाड्यातील काही जागांचा समावेश आहे.