Tuesday, 23 December 2014

दंडाधिकारीय चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

  उस्‍मानाबाद -  उस्मानाबाद  जिल्हा कारागृहातील न्यायाधीन बंदी  हणमंत काशीनाथ गायकवाड, रा. सरमकुंडी, ता. वाशी यांच्य मृत्यूबाबत दंडाधिकारीय फेरचौकशीचे आदेश जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिले होते.त्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, उस्मानाबाद यांना चौकशी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यानुसार, या प्रकरणी मयताच्या नातेवाईकास संबंधित कैद्याच्या मृत्युबाबत काही माहिती किंवा म्हणणे मांडावयाचे असेल तर सबळ पुराव्यासह दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे हजर राहून दाखल करावे, असे उपविभागीय दंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी कळविले आहे.
 हणुमंत गायकवाड यांचा  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे वैद्यकीय उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. 

Labels: