पांगरी (गणेश गोडसे) महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने विविध खात्यांतर्फे आज जलयूक्त अभियानाअंतर्गत पांगरी परिसरात शिवार फेरी काढून शेतात जावून विविध खात्यांची विकास कामे शासनाला सुचवण्यात आली.अकरा कोटी रुपयांचा विविध प्रकारच्या कामांचा अंदाजित आराखडा तयार करण्यात येणार असून भविष्यात यामधून अनेक फायदे होणार आहेत.कृषि विभाग,महसूल विभाग,ग्रामपंचायत,वनीकरण विभाग यासह अधिकारी,पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी शिवार फेरी काढून शेतकर्‍यांणा या योजनेचे व मोहिमेचे महत्व सांगून त्यांना अपेक्षित असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली.शिवार फेरीत प्रस्तावित करण्यात येणार्‍या कामांना शाशन निधि उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे शेत्क्र्यांणा याचा खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
या शिवार फेरीत पांगरीचे सरपंच विजय गोडसे,माजी सरपंच जयंत पाटील,रामा लाडे,सतीश जाधव,ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर,कृषि सहाय्यक राजाभाऊ देशमुख,कृषि पर्यवेक्षक श्री. व्ही.के.मिस्कीन,गाव कामगार तलाठी श्री.आर.एस.देशमुख,बालाजी पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
  टॅंकरमूक्त गाव करणे,विहीर,बोअर वेल,साठवण तलाव आदीमधील पाणीसाठा वाढवणे तसेच ओढा रुंदीकरण,खोलीकरन,गाल काढणे,पाझर तलावाची दुरूस्ती करणे,ओढे,नाल्
यांवर सीमेंट बंधारे बांधणे,ओढा रुंदीकरण,माती नाल बांधा,समतल सलग चार काढणे,आदि जळसाठा वादवण्यांची व जमिनीची धूप होणार नाही यासाठी गरजेची असणारी सर्व कामे यात प्रस्तावित आहेत.यामुळे ओढे,बंधारे मोकळे होऊन त्यात पानी साठा होऊन नदीकाठावरील शेतकर्‍यांणा त्या पाण्याचा लाभ होणार आहे.फेरीत परिसरात उपलब्ध असलेल्या पाझर तलावाच्या नेक साईट यावेळी फेरीतील अधिकार्‍यांना दाखवण्यात आल्या.सामाजिक वनीकरण विभागातर्फे पांगरी भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हावी अशी शेतकर्‍यांणी यावेळी मागणी केली.पहाणी करण्यात आलेल्या अनेक कामांचा साधारणत: 11 कोटी रुपयांच्याही पुढे अंदाजित खर्च अपेक्षित आहे.टोणेवाढी तलाव जोडणारा ओढा,शिरपूर पद्धतीचे दहा नवीन बंधारे,म्हसे ओढा,कुंभार नाला,चिंचोळी पांगरी हाडीवर पाझर तलाव,विविध डोंगरावर समतल चर खोदणे,आदि विविध कामांचा आराखडा करण्यात आला.
 
Top