Sunday, 21 December 2014

अल्‍पवयीन मुलीस महिलेनेच पळविले

पांगरी (गणेश गोडसे) शालेय शिक्षण घेणार्‍या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस एका महिलेनेच तिच्या घरी बोलाऊन घेऊन तिला फूस लावून पळवून घेऊन गेल्याची घटना शिराळे ता.बार्शी येथे भर दुपारी घडली.सौ.क्रांती तानाजी चंदनशीवे रा.शिराळे असे मुलीस फूस लावून पालाऊन घेऊन गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नांव आहे.
 पळवून नेण्यात आलेल्या मुलीच्या वडिलांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची मुलगी शुक्रवारी दि.19 रोजी शाळेत गेली असता आरोपी महिलेने तिला तिच्या घरी बोलावून घेऊन तिला फूस लावून पळवून नेले आहे.वडिलांच्या तक्रारीवरून संबंधित महिलेविरुद्ध पळवून नेल्याप्रकरणी रात्री उशिरा पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड हे करत आहेत.

Labels: