Monday, 23 February 2015

जळकोट ग्रा.प च्‍या वतीने जीवन गोळे यांचा सत्‍कार

जळकोट - (संजय रेणुके) भारतीय प्रजासत्‍ताक दिनाच्‍या संचलनामध्‍ये बनवण्‍यात आलेला "पंढरीची वारी " या महाराष्‍ट्राच्‍या चित्ररथास राष्‍ट्रीयस्‍तरावर प्रथम पुरस्‍कार मिळाला. हा महाराष्‍ट्रवासिंयांचा बहुमान तर आहेच त्‍याचबरोबर उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील नागरिकांसाठी हा बहुमान दुप्‍पट मिळाला आहे. कारण
हा चित्ररथ बनवणा-या कारागिरमध्‍ये जळकोट ता. तुळजापूर येथील जीवन सिताराम गुळे हा मुर्ती बनवणारा कारागीर(कलावंत) आहे. हा शिल्‍पकार  राष्‍ट्रीयस्‍तरावरील प्रथम पुरस्‍कार मिळाल्‍यानंतर पहिल्‍यांदा गावी आल्‍याने जळकोट ग्रामपंचायतच्‍यावतीने त्‍याचा शाल, श्रीफळ, पुष्‍पहार घालून दि. 23 फेब्रुवारी  भव्‍य सत्‍कार करण्‍यात आला. जीवन गुळे यांच्‍या कामगिरीने जळकोट वासियांसह उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील नागरिकांच्‍या शिरपेचात मनाचा तुरा खोवला गेला असल्‍याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
     तुळजापूर तालुक्‍यातील  जळकोट येथील जीवन गुळे हा शिल्‍पकार मुंबई येथील सर जे.जे स्‍कुल ऑल आर्ट या शिल्‍पकार घडवणा-या महाविद्यालयातून पदवीकेचे शिक्षण सन 2006 साली पूर्ण केले.  कला जोपासण्‍यासाठी केवळ अर्थिक बळ नसल्‍याने आजतागायत जीवन गुळे हा परि‍स्थितीशी झगडत  जीवन जगत आला आहे. घरची अर्थिक परिस्थिती अत्‍यंत हालाखीची, वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेले, वयोवृध्‍द आईसह  पत्‍नी व तीन मुलांची जबाबदारी खांद्यावर असल्‍याने सहा माणसांचा उदनिर्वाह भागवणे आजच्‍या महागाईच्‍या काळात महाकठीणच. असे असताना एखाद्या ठिकाणच्‍या मागणीनूसर छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुध्‍द, स्‍वामी समर्थ, गणेश मुर्ती आदी शिल्‍प तयार करून आपली कला जोपासण्‍यासोबत कुटुंबाचा चरितार्थही कसाबसा भागवण्‍याचे काम केले आहे. अशाच मुंबईतील मित्रकंपनीच्‍या ओळखीने दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्‍ताक दिनाच्‍या संचलनात महाराष्‍ट्र राज्‍याचा चित्ररथ बनवण्‍याचे अत्‍यंत जोखमीचे पण सन्‍मानाचे काम करण्‍याची संधी मिळाली, मिळालेल्‍या संधीचे जीवन गुळे यांच्‍यासह 10 शिल्‍पकार व 55 अन्‍य कारागीर यांनी सोने केले आहे. ग्रामपंचायतीच्‍यावतीने झालेल्‍या सत्‍कार प्रसंगी गुळे यांचे मित्र तथा लष्‍करातील हवालदार या पदावर कार्यरत असलेले दाजीबा काळे यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी  अरूण लोखंडे, संजय अंगुले, ग्रामसेवक संजय कारभारी, मेघराज किलजे, सुनिल माळगे, अशोक खूने, मल्‍लय्या स्‍वामी, नागू स्‍वामी, विलास फुकटे, बाबू कांबळे, सोमा स्‍वामी, अनिल पासोडे, काशिनाथ परिट, निवृत्‍ती गंगणे, आदीसह नागरिक उपस्थित होते. 

Labels: