एरोनॉटिकल पदविका व पदवी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी
![]() |
| डॉ. जयसिंगराव गणपतराव देशमुख |
उस्मानाबाद, दि. 28 : महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एरोनॉटिकल पदविका तसेच पदवी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
एरोनॉटिकलमध्ये पदविका व पदवी शिक्षणाची महाराष्ट्रात आज घडीला उपलब्ध नाही.आज जगामध्ये एरोनाॅटिल अभियांत्रिकी शिक्षणाला विशेष महत्व प्राप्त झाले असून महाराष्ट्रातील तरूणांना अशा प्रकारचे आधुनिक शिक्षण देणे काळाची गरज झाली आहे.
विमानाच्या देखभाल व दुरुस्तीचे प्रशिक्षण नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन 2019 पासून सुरू केले असून संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त 40 मुलांना प्रवेश देण्यात येतो.अशाच प्रकारे औरंगाबाद,कोल्हापूर,पुणे,मुंबई,नाशिक आदी किमान विभागीय स्तरावर अशा प्रशिक्षणाची सोय राज्य सरकारने उपलब्ध करुन द्यावी अशी पालकांची मागणी होत आहे.औध्योगिक प्रशिक्षण संस्थेत असे प्रशिक्षण दिल्यामुळे एरोनाॅटिकल क्षेत्रातील तज्ञ फिटर एरोनाॅटिकल एव्हिएशन कंपन्यांना मिळु शकतील परंतु पदवी तसेच पदविका एरोनाॅटिकल अभियांत्रीकी शिक्षण घेऊन तरुण तयार झाले तर त्यांना चांगल्या पदावरील नोकर्या मिळु शकतील.
महाराष्ट्रील एकमेव नागपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एरोनाॅटिकल चा प्रवेश 93% पर्यंत कट ऑफ आहे म्हणजे 93 % चे विध्यार्थी फिटर वगैरे होणार त्यापेक्षा अशा मुलांना पदविका,पदवी एरोनाॅटिकल अभियांत्रीकी मध्ये मिळण्याची सोय महाराष्ट्र राज्य सरकारने उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज आहे.
दसाॅल्ट एव्हिएशन कंपनी फ्रांस या सारख्या जगभरातील विदेशी कंपन्या आपल्या देशात येत आहेत.त्यांना इंजिनियर,तंत्रज्ञ यांची गरज भासणार आहे.आज आपल्या मुलांना एरोनाॅटिकल पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी दिल्ली सारख्या ठिकाणी जावे लागते.हे सामान्य पालकांच्या आवाक्याबाहेर आहे.मुलांच्या भविष्याचा विचार करुन महाराष्ट्र राज्य सरकारने एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरू करावेत अशी मागणी माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव गणपतराव देशमुख यांच्यासह असंख्य पालकांनी केली आहे.
Labels: Osmanabad


<< Home