Monday, 31 August 2020

तुळजापूर : छावा संघटनेच्या नूतन पदाधिका-यांच्या निवडी संपन्न

 


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

अखिल भारतीय छावा संघटनेची आज सोमवार दि. 31 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत नूतन पदाधिका-यांच्या निवडी करण्यात आल्या तर. शेकडो युवकांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला. 

तुळजापूर येथे छावा संघटनेची सोमवार रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी पुढीलप्रमाणे पदाधिका-यांची निवड करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी दिनेश रोचकरी  (तुळजापुर विभाग), शशिकांत पाटील (उस्मानबाद-कंळब विभाग), जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष विजय माने, तुळजापुर तालुकाध्यक्ष लखन मोटे, तालुका कार्याध्यक्ष प्रसाद शिंदे, उपाध्यक्ष कमलराजे शिंदे, तालुका सचिव महादेव शिंदे, तुळजापुर शहर अध्यक्ष आण्णासाहेब इंगळे यांची निवड करण्यात आली. तर  भुम, परंडा, उस्मानाबाद, उमरगा, लोहारा, कळंब, तुळजापुर येथील शेकडो युवकांनी प्रवेश केला.

या बैठकीस संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, विद्यार्थी आघाडी प्रदेश विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, पिपंरी चिचंवड शहर अध्यक्ष गणेश जाधव, उस्मानाबाद युवक जिल्हाध्यक्ष कालीदास गायकवाड  यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक विजय माने यांनी तर सुत्रसंचालन शशिकांत पाटील यांनी केले.

Labels: