Monday, 31 August 2020

कोरोनाची लक्षण असणाऱ्या नागरिकांनी आरोग्य खात्याशी संपर्क करावा - डॉ. अमोल सुर्यवंशी

 

रुईभर, दि. 31 : कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी आरोग्य खात्याची संपर्क करून गावात वाढत चाललेल्या कोरोना पेशंटची संख्या कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येऊ शकतो असे, मत बेंबळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी यांनी रुईभर येथे शनिवारी आयोजित केलेल्या कोरोनाच्या ऑंटी जन टेस्ट शिबिराप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी डॉ. सुर्यवंशी पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने सार्वजनिक ठिकाणी जात असताना आपली काळजी घ्या व आपल्या मुळे इतरां ना कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या सरकारने सांगितलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे असेही त्यांनी शेवटी सांगितले.

या शिबिरात बेंबळी रुईभर देवळाली येथील 60 नागरीकांची कोरोना पेशंटच्या संपर्कात आलेले यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात 6 नागरिक कोरोना पॉझिटिव निघाले. त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद  येथील आयुर्वेदिक दवाखान्यात दाखल करण्यात आले.

या शिबिरात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.पूजा पवार, डॉ. प्रियांका नायगावक,र आरोग्य सेवक काका वाघमारे, मधुकर कोल्हाळ, गजानन भोसले, आरोग्य सेविका शुभांगी स्वामी, आशा कार्यकर्ती गांधले भोईटे निंबाळकर ग्रामपंचायत कर्मचारी पारवे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.  शिबिरास उपसरपंच बालाजी कोळगे, ग्रामसेवक प्रदीप कुंभार ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.


Labels: