Sunday, 30 August 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आज 207 कोरोना रुग्णांची वाढ; तर चौघांचा मृत्यू



उस्मानाबाद, दि. 30 : जिल्हयात रविवार दि. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या अहवानुसार आज जिल्हयात 207 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 251 रुग्ण बरे होवून घरी गेले आहत. 

जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 535 वर पोहचली आहे. यापैकी 3 हजार 552 जण बरे झाले असून 1 हजार 841 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 142 जणांचा बळी गेला आहे.








Labels: