Sunday, 30 August 2020

तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने किरण चौधरी यांचा सत्कार

 


तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापुर तालुका पञकार संघाच्या शहर अध्यक्षा कु. किरण चौधरी यांची नुकतीच  स्टार महाराष्ट्र न्युज पुणे येथे निवड झाल्यामुळे  तुळजा तालुका पञकार संघाच्या वतीने रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी उस्मानाबाद जिल्हा पञकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या हस्ते शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्याना पुढील वाटचालीस हार्दीक शुभेछा देण्यात आल्या.

यावेळी तुळजापुर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप अमृतराव, सचिव कुमार नाईकवाडी, पञकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष सचिन ताकमोघे, तालुका उपाध्यक्ष प्रमोद कावरे, सचिव अमिर शेख, पञकार गुरुनाथ बडुरे, अनिल आगलावे, आशा वाघ  आदिसह पञकार बांधव  उपस्थित होते.

Labels: