Sunday, 30 August 2020

आमदार ज्ञानराज चौगुले यांची तत्परता; गाडीतून उतरुन अपघातातील जखमीना केली मदत


जळकोट, दि. 30 : मेघराज किलजे 

उमरगा-लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले हे  तुगाव (ता. उमरगा) या ठिकाणी नियोजित दौऱ्यानिमित्त जात असताना मुरुम मोड समोरील पेट्रोल पंपाजवळ अपघात झाल्याने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लगेच गाडी उभी करुन अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना उमरगा येथे तात्काळ पाठवून दिले. 

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापूरे ,माजी नगरसेवक विवेक हराळकर यांनी जखमीना  पट्टी बांधून धीर दिला.    यापूर्वीही आमदार ज्ञानराज चौगुले यांनी अनेक अपघातात मदत केलेली आहे. 


Labels: