Saturday, 29 August 2020

काटी येथे रॅपिड अॅंन्टीजेन टेस्ट मध्ये सातजण कोरोना पॉझिटिव्ह

 


काटी : उमाजी गायकवाड

  तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि.29  रोजी आरोग्य अधिकारी डॉ. अजित राठोड, एएनएम सी.एन.माळी, आरोग्य सेवक विभुते, तलाठी प्रशांत गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 50 जणांची अॅंन्टीजेन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांसह ड्रायव्हरसह अन्य एकजण असे सातजणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपर्कातील अन्य लोकांची शोध मोहीम सुरू असून संपर्कातील लोकांनी स्वत:हुन पुढे येण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच आदेश कोळी यांनी केले आहे.

 शनिवारी आलेल्या सातजणांच्या अहवालामुळे  काटी येथील रुग्णांची संख्या आता 44 वर गेली असून 44 रुग्णांपैकी एका 81 वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 35 रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. काटीतील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Labels: