Saturday, 29 August 2020

श्री तुळजाभवानी मंदीरासमोर भाजपाचे घंटानाद आंदोलन

 

                                  

तुळजापुर : कुमार नाईकवाडी


महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदीमाया आदी शक्ती असलेल्या श्री आई तुळजाभवानी मातेच्या राजे शहाजी महाद्वार समोर भाजपाच्या वतीने  राज्य सरकारला जाग येण्यासाठी   दि.२९ शनिवार रोजी महाराष्ट्रातील तिर्थ क्षेत्र उडण्यात यावे, या मागणी करिता "दार उघड उद्धवा दार उघड!"अशी भावनिक साद घालुन ढोल वाजवुन, घटांनाद करुन काळ्या फिती लावुन आंदोलन करण्यात आले.


 यावेळीतुळजापुर तालुक्याचे भा.ज.पा.चे आमदार राणाजगजित सिंह पाटील म्हणाले की, संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे गेल्या ५ महिन्यापासुन महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक स्थळ बंद असल्यामुळे व्यापारी वर्गासह पुजारी वर्गाचे मोठे हाल होत आहेत. केंद्र सरकार ने इतर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे टप्प्या टप्याने उघडली आहेत. माञ हे सरकार धार्मिक स्थळे उघडायला तयार नाही. नियम अटी घालुन धार्मिक स्थळे सुरु करावी, धार्मिक स्थळामध्ये प्रार्थना करणे हा आपला प्रत्येकाचा अधिकार आहे. देवा दुताचे दर्शन केल्याने मनाला शांती लाभते. शरीराला उर्जाप्राप्त होते. त्यामुळे धार्मिक स्थळे उघडण्यात यावे, तसेच या राज्य सरकारने व्यापारी वर्गाला व पुजारी बांधवाना कोणतीही आर्थिक मदत केली नाही. सामाजिक अंतर ठेवुन योग्य त्या उपाययोजना करुन महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात यावे म्हणून या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भा.ज.पा.च्या वतीने श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात  ढोल वाजवुन घंटा नाद करण्यात आला. या पुढील काळात सरकारने महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडले नाहीत तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


या घंटानाद आंदोलनात आमदार राणाजगजितसिंह पाटील, भा.ज.पा.चे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे,   नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक सचिन पाटील, विनोद गंगणे, आनंद कंदले, अविनाश गंगणे, नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे, विकास मलबा, विशाल रोचकरी, सचिन रसाळ, सागर कदम, नारायण नन्नवरे, शिवाजी बोधले, रत्नदीप भोसले, भा.ज.पा.मिडिया सेल चे संजय खुरुद, बाळासाहेब शिंदे, सुहास साळुंके, प्रा काकासाहेब शिंदे, इंद्रजीत सांळुके, बाळासाहेब श्यामराज, उमेश गवते, प्रसाद पानपुडे, गिरीष देवळाकर, अँड. अंजली साबळे, क्रांती थिटे, मिना सोमाजी, स्वाती शिंदे, मार्डीकर आदीसह भा.ज.पा चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels: