Friday, 28 August 2020

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आज 80 जण पॉजिटीव्ह; तर दोघांचा मृत्यू

 


उस्मानाबाद, दि. 28 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 80 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत.  तसेच आज दिवसभरात 142 जण बरे होवून घरी परतले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 5 हजार 187 झाली आहे. यातील 3 हजार 225 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 133 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 829 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.






Labels: