तुळजापूरच्या भूमिपुत्राने गाठले यशोशिखर
तुळजापूर,दि.२९: येथील मुळ हंगरगा गावचे सुपुत्र, तुळजाभवानी महाविद्यालयाचे मराठी विभागात एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून कार्य केलेले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सद्ध्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालय ऊस्मानाबाद येथे मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा.अरविंद हंगरगेकर यांना नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत पी.एच.डी.प्राप्त झाली.
हे त्यांचे यश तुळजापूर तालुक्यासाठी नक्कीच भूषणावह आहे.अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करून त्यांनी प्राप्त केलेले हे यश ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी एका प्रकारे प्रेरणा देणारेच ठरणार आहे.त्यांचे बहिस्थ परिक्षक प्रो.डॉ.विनोद गायकवाड(बेळगाव विद्यापीठ) हे होते तर प्रा.डॉ.चेतना सोनकांबळे (अधिष्ठता, डॉ.बा आं.म.वि.आऔरंगाबाद)या अध्यक्षस्थानी होत्या.तुळजाभवानी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख यांच्या उत्कृष्ठ अशा मार्गदर्शनामुळेच त्यांनी हे यश प्राप्त केले.त्यांच्या या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे सहसचिव (प्रशासन)संस्थेचे मराठवाडा विभागप्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबादचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी तसेच माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके,माजी प्राचार्य डॉ.वसंत वाघ(फर्ग्युसन कॉलेज) प्रा.संभाजी भोसले (सिनेट सदस्य,) , मुख्याध्यापक वागतकर सर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तसेच परिसरातील अनेक नामवंत साहित्यिकांनी अभिनंदन केले.
Labels: Tuljapur


<< Home