निसर्ग पावला; पण महावितरण कोपले
काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विद्युत उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावच्या पुर्वेला असणाऱ्या गाटेवाडी शिवारातील गाटे डिपी म्हणून परिचित असलेला डिपी (रोहित्र) गेल्या महिनाभरापासून जळाला असून या डिपीवर अवलंबून असलेल्या पन्नास ते साठ शेतकऱ्यांचे पिके पाण्याअभावी सुकू लागली असून कांदा पिकांच्या लागवडी ठप्प आहेत.
गावच्या चार-पाच वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा भरपूर पाऊस झाला. कायम कोरडेठाक राहणाऱ्या जलस्रोतात मुबलक पाणी आले. पण, वीजपुरवठ्या अभावी पिके करपून जात आहेत. जळालेल्या रोहित्रांसाठी येथील या भागातील शेतकरी वारंवार पाठपुरावा करत असून याच डिपीवर पोलीस सेवेत कार्यरत असलेले धनंजय राऊत यांची शेती असून धनंजय राऊत हे डिपीसाठी गेली 20 ते 25 दिवस वारंवार पाठपुरावा करत आहेत. परंतु महिना उलटला तरी डिपी मिळेना त्यामुळे निसर्गाने तारले आणि महावितरणने मारले असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आम्हाला ट्रान्सफॉरमर 'डिपी' मिळेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ डिपी देण्याची मागणी धनंजय राऊत यांच्यासह शेतकऱ्यांमधून होत आहे.
Labels: Tuljapur


<< Home