तुळजापूर  -  तुळजाई सांस्‍कृतिक व क्रीडा (तुळजापूर खुर्द) मंडळाने गणेशोत्‍सव साजरा न करता मंडळाच्‍या सभासदातून जमलेली अकरा हजार रूपयाची वर्गणी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीसाठी म्‍हणून जिल्‍हाधिका-याकडे धनादेश सुर्पूद केले आहे.  या मंडळाचे स्‍तुत्‍य उपक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
      या मंडळाने अकरा वर्षापूर्वी गुजरातच्‍या भुकंप व पुरग्रस्‍तासाठी, किल्‍लारीच्‍या भूकंपग्रस्‍तासाठी 21 हजार रूपये आर्थिक मदत केली होती. मंडळाने आजपर्यंत कसलेही वर्गणी गोळा न करता सभासद वर्गणीतून विविध समाजोपयोगी व समाज प्रबोधनपर कार्यक्रमास महत्‍व दिले आहे. त्‍याचबरोबर पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन, समाजोपयोगी रक्‍तदान, नेत्रचिकित्‍सा, दंतचिकित्‍सा, स्‍त्रीरोग, बालरोग असे शिबिर या मंडळाने यापूर्वी आयोजन केले आहे. त्‍याचबरोबर बौद्धीक व्‍याख्‍याने घेवून स्‍त्रीभ्रूण हत्‍या रोखण्‍यासाठी एका मुलीवर कुटुंब नियोजन करणा-या दांम्‍पत्‍यास एक लाख रूपये देण्‍याचे ठरविले आहे. मंडळाच्‍या कार्याची दखल घेवून शासनाने दलित मित्र पुरस्‍कार, नेहरू युवा केंद्राचा युवा पुरस्‍कार, एक गाव, एक वार्ड गणपती जिल्‍हा पुरस्‍कार यासह एडस् जनजागरण पुरस्‍कार, सोलापूर डॉ. हेडगेवार रक्‍तपेढीचे उत्‍कृष्‍ट रक्‍त संकलनाचा जिल्‍हास्‍तरीय पुरस्‍कार देवून मंडळाला गौरविले आहे.
मंडळाच्‍यावतीने दुष्‍काळग्रस्‍तांसाठी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीसाठी नुकतेच 11 हजार रुपयाचा धनादेश जिल्‍हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांच्‍याकडे दिले. यावेळी मंडळाचे अध्‍यक्ष अजय देशमाने, आदिनाथ तुळजापूरे, प्रमोद क्षीरसागर, हणमंत साबळे, मकसूद शेख, महेश कांबळे व सभासद उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्‍यक्षा अर्चना गंगणे, उपनगराध्‍यक्ष बाळासाहेब शिंदे, तहसिलदार व्‍ही.एल. कोळी, नगरसेवक पंडित जगदाळे, तुळजाई पतसंस्‍थेचे चेअरमन राजेंद्र देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
Top