नळदुर्ग :-  देवसिंगा (नळ) ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायतीस गेल्या चार वर्षात विविध योजनांतर्गतमिळालेल्यालक्षावधी रुपयाचा निधीत गैरप्रकार झाल्याने विकास कामांचा बट्‌ट्याबोळ झाले असून या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करुन संबंधितावरकडककारवाई करण्याची मागणी माजी पं.स. सदस्य विष्णु शामराव घोडके यासह ग्रामस्थांनी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे देवसिंगा नळ (ता. तुळजापूर) येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करुन सन २००८ ते २०१२ या कालावधीत ग्रामपंचायतीस आलेला निधी उचलून एकही काम केले नसल्याचा आरोप करुन म्हटले आहे की, वरील कालावधीत सुमारे दहा ते अकरा लाख रुपये निधी उचलल्याचे सांगितले आहे. सदरील विविध कामाचे पैसे उचलून सर्व काम अर्धवट आज रोजी आहेत. गावातील अर्धवट कामे पूर्ण करावे या मागणीचे तुळजापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंचासह संबंधितांना तोंडी व लेखी तक्रार देवूनही याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करण्यात आले आहे.
देवसिंगा ग्रामपंचायत अंतर्गत तांड्यावरील अंगणवाडीचे बांधकाम अर्धवट, दलित वस्ती, समाज मंदीराचे बांधकाम अर्धवट आहेत. त्याचबरोबर मागील सर्व अर्धवट कामे पूर्ण केल्याशिवाय यापुढे ग्रामपंचायतीला निधी वाटप करु नये, असे सांगून पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी वीस दिवसापूर्वी तुळजापूर तालुका दौर्‍यावर असताना दि. ९ सप्टेंबर रोजी देवसिंगा नळ गावास भेट देवून पाहणी केली. यावेळी संबंधित कामे पूर्ण करुन ग्रामस्थांना न्याय देण्याचे लेखी निवेदन दिल्याने त्यानी तात्काळ संबंधित अधिकार्‍यांना आदेश दिले. मात्र तरीही वीस दिवसाचा कालावधी उलटला, अद्यापपर्यंत काहीच हालचाल झाली नाही. संबंधित कामाचा निधी गैरप्रकार थांबवून अर्धवट कामे तात्काळ सुरु करुन मार्गी लावावी व दोषीवर कडक कारवाई अशीही मागणी करण्यात आली आहे. याची एक प्रत पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, जिल्हाधिकारी उस्मानाबाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, तुळजापूर तहसिलदार, तुळजापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी आदीना देण्यात आले आहे.

 
Top