नळदुर्ग :-  येथील महाराणा प्रताप गणेश मंडळाने गणेशोत्सवात अनावश्यक खर्चाला फाटा देवून विविध उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष शहबाज काझी यानी केले.
                शहरातील महाराणा चौकात महाराणा प्रताप गणेश मंडळाने गणेशोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी विविध घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहबाज काझी हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नितीन कासार, व्यासपीठावर पत्रकार शिवाजी नाईक, माजी नगरसेवक अनिल हजारे, शहर कॉंग्रेस दलाचे अध्यक्ष विनायक अहंकारी, शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष बसवराज धरणे, शिवसेनेचे तालुकाउपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, माजी नगरसेवक सुधीर हजारे, अर्चना डुकरे, नगरसेवक सचिन डुकरे आदीजण उपस्थि होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व प्रमुख अतिथीचे सत्कार मंडळाचे अध्यक्ष अजितसिंह हजारी, उपाध्यक्ष बालसिंह चौहान, इंद्रजित ठाकूर, सागर हजारी, अनिकेत बिसेनी, जगदीश गहेरवार, मंगेश चंदेले, अनिल दिक्षीत, सुजित हजारी, मनीष हजारी, अजय चंदेले, सुनिल हजारी आदीजणानी केले.
                    यावेळी महिला व विविध स्पर्धेतील विजेत्या शालेय विद्यार्थ्यांना कप, मेडल व शैक्षणिक साहित्य असा पारितोषिक देवून गौरविण्यात आला. यावेळी विनायक अहंकारी यानी मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक करुन अभिनंदन केले. त्यानंतर विजेता स्पर्धक आकाश कांबळे याने थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.
 
Top