नळदुर्ग :-  येथील भीमनगर लगत असलेल्या दलित वस्तीमध्ये बेवारस मृतदेह दफन गेल्या अनेक वर्षापासून दफन करण्यात येत आहे. ते बंद करून इतरत्र ठिकाणी मृतदेह दफन करावे, अशी मागणी सम्राट बहु उद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
            नळदुर्ग येथील दलित वस्तीत अनेक वर्षापासून बेवारस मृतदेह दफन केले जात असून त्याना जागेच्या केवळ २० ते २५ फुटावर चौरस बाजू एक महिलांसाठी शौचालय असून त्याच्या पूर्वेला मशीद असून पश्चिमेला कब्रस्तान आहेत. यासाठी दलित वस्तीतील महिला शौचालय बांधकाम होणार असून ते शौचास जाणा-या महिलामध्ये भय निर्माण झाले आहे. शहरापासून एक किमी अंतरावर बेवारस मृतदेह दफन करण्याकस यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या अर्जावर सम्राट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत चंद्रकांत सुरवसे, दादासाहेब बनसोडे, संतोष लोखंडे, अमोल सोनकांबळे, आकाश गायकवाड, सचिन कांबळे, अभिजीत कांबळे, सुभाष रणे आदींच्या सह्या आहेत. 
          नळदुर्ग शहरातील भिमनगरमध्ये १९३६ सालापासून असलेली आड (विहीर) असून विहीरीतील पाणी स्वच्छ आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्याचबरोबर नळदुर्गच्या बोरीधरणात पाण्याच्या मृतसाठा असून भविष्यात पाणी टंचाई जाणवणार असल्याने नगरपालिकेने या विहीरीच्या परिसराची स्वच्छता करुन येथील पाणी उपयोगात आणता येते. तरी याप्रकरणी विहीरीचा परिसर स्वच्छ करुन घ्यावे, अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी याना सम्राट ग्रुपचे मुख्य प्रवर्तक सुर्यकांत सुरवसे, पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केली आहे.


 
Top