नळदुर्ग -: लातूर सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांच्या धर्मपत्नी कै. शांताबाई आलुरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त अणदूर (ता. तुळजापूर) येथे ‘राज्यस्तरीय शांताई जीवन गौरव सोहळा’ संपन्न झाला. यावेळी शांताई जीवन गौरव पुरस्काराने प्रमुख मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार निर्मला ठोकळ या उपस्थित होत्या. निवृत्त प्राचार्या कमल ठकार, तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन नरेंद्र बोरगांवकर आदींजण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोलापूरचे महापौर अलका राठोड, ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेविका पुष्पा भावे, डॉ. मंजिरी निमकर, स्मिता खानापूरे, छाया जगताप, ज्येष्ठ समाजसेविका नसिमा हुरजूक आदींना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्याद्दल जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी अनेकांनी शांताकाकी यांच्याबद्दल गौरव उद्गार काढून त्यांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांनी केले. तर प्रा. उमाकांत चनशेट्टी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. याप्रसंगी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेशवे, जिल्हा परिषद सदस्या पार्वती घोडके, अस्मिता कांबळे, सरपंचे शशिकला शेटे, स्वातंत्र्यसैनिक बंडाप्पा सुरवसे, गोकुळ शिंदे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिनाथ बिराजदार तर आभार प्राचार्या मुदकण्णा यांनी मानले.

 
Top